मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारात शिस्त यावी, ग्राहकांचे हित जपले जावे आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे व्हावेत यासाठी महारेराने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विकासकांना प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारासाठी तीन स्वतंत्र बँक खाती उघडावी लागणार आहेत. एकाच अनुसूचित बँकेत प्रकल्पाचे संचलन खाते, विभक्त खाते आणि व्यवहार खाते अशी तीन बँक खाती ठेवण्याचा प्रस्ताव आपल्या सल्लामसलत पेपरमध्ये जाहीर केला आहे .ही खाती विकासकाच्या आणि प्रकल्पाच्याच नावे असणे आवश्यक आहे. ही खाती उघडताना बँकेने हा तपशील महारेराच्या संकेतस्थळावरून पडताळून घ्यायचा आहे. शिवाय हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या तारखेला या खात्यातील सर्व व्यवहार थांबवायचे आहेत. प्रकल्पाला महारेराने मुदतवाढ दिल्याशिवाय त्या खात्याचा वापर करता येणार नाही. विकासकाला प्रधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय बँक खाती बदलता येणार नाहीत, असे महारेराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा