मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या ११७२ आहे. या खालोखाल ठाणे (५९७), मुंबई उपनगर (५२८), रायगड (४५०), नागपूर (३३६), नाशिक (३१०) आदींचा समावेश आहे. राज्यातील प्रदेशनिहाय संख्या पाहिल्यास मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड हा मुंबईलगतचा भाग आणि कोकणाचा समावेश असलेल्या महाप्रदेशातील प्रकल्पांची संख्या १९७६ अशी सर्वात जास्त आहे. यानंतर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील १४१५ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळालेले आहेत. विदर्भातील ४३७ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले असून त्यात नागपूरचे ३३६ प्रकल्प आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ३४७ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात नाशिकचे ३१० प्रकल्प आहेत. मराठवाड्यातील १४९ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात औरंगाबादचे ११७ नवीन प्रकल्प आहेत. दादरा नगर हवेलीचेही आठ प्रकल्प आहेत.

हेही वाचा : वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
Transfer of Rs 1500 aid under Ladki Bahin scheme resumes in Maharashtra
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
National Book Trust is expanding across India with offices opening in Pune cities
एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण

प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, घरखरेदीदारांच्या तक्रारी उद््भवू नये यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक देताना प्रत्येक प्रकल्पाची वैद्यता, आर्थिक आणि तांत्रिक अशा त्रिस्तरीय पातळीवर कठोर छाननी करूनच नोंदणी क्रमांक मंजूर करते. याशिवाय कल्याण-डोंबिवली भागातील प्रकल्पांतील अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणी क्रमांक देण्यापूर्वी संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून ‘बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र’ त्यांच्या पदनिर्देशित ईमेल वरून महारेराच्या पदनिर्देशित ई-मेलवर पाठवणे बंधनकारक केले आहे. महारेराने गेल्या १९ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याशिवाय नोंदणी क्रमांक दिला जात नाही. सुरूवातीच्या तुलनेत यात सुसूत्रता आलेली असली तरी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेले मंजुरीचे इमेल मिळण्यात काही प्रमाणात होणारा विलंब आणि प्रस्तावातील त्रुटींची संबंधित विकासकाकडून पूर्तता होऊ न शकल्याने ५४७१ प्रकल्पांपैकी ४३३२ प्रकल्पांना नोंदणीक् क्रमांक मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ११३९ प्रकल्पांची छाननी सुरू आहे. संबंधित विकासकांनी त्रुटींचा पूर्तता केल्यानंतर त्यांना नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे महारेराच्या प्रवक्त्याने सांगितले.

जिल्हानिहाय प्रकल्पांचा तपशील : मुंबई महाप्रदेश- १९७६,
पश्चिम महाराष्ट्र – एकूण १४१५
विदर्भ- ४३७, उत्तर महाराष्ट्र-३४७, मराठवाडा -१४९,दादरा नगर हवेली एकूण -८

Story img Loader