मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या ११७२ आहे. या खालोखाल ठाणे (५९७), मुंबई उपनगर (५२८), रायगड (४५०), नागपूर (३३६), नाशिक (३१०) आदींचा समावेश आहे. राज्यातील प्रदेशनिहाय संख्या पाहिल्यास मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड हा मुंबईलगतचा भाग आणि कोकणाचा समावेश असलेल्या महाप्रदेशातील प्रकल्पांची संख्या १९७६ अशी सर्वात जास्त आहे. यानंतर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील १४१५ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळालेले आहेत. विदर्भातील ४३७ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले असून त्यात नागपूरचे ३३६ प्रकल्प आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ३४७ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात नाशिकचे ३१० प्रकल्प आहेत. मराठवाड्यातील १४९ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात औरंगाबादचे ११७ नवीन प्रकल्प आहेत. दादरा नगर हवेलीचेही आठ प्रकल्प आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा