लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : गृहप्रकल्पाबाबत विकासकांनी संपूर्ण तपशील महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाच्या (महारेरा) संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंघनकारक आहेच. परंतु याबाबतची माहिती महारेराला सादर करणेही आवश्यक आहे. याबाबत आता विकासकांना पुरेपूर वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात अद्ययावत माहिती सादर न करणाऱ्या विकासकांविरुद्ध अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे.

BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार

विकासकांनी प्रकल्पांची त्रैमासिक प्रगती अहवाल संकेतस्थळावर अद्ययावत करून महारेराकडे सादर न करणाऱ्या विकासकावर कारवाई करण्यात आल्यामुळे आता सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे, असा दावा महारेरातील एका अधिकाऱ्याने केला. एप्रिल महिन्यात नोंदवलेल्या ४८० प्रकल्पांपैकी २२२ प्रकल्पांत (४६ टक्के) मुदतीआधीच अपेक्षित सर्व तपशील अद्ययावत करून ती माहिती महारेराला सादर करण्यात आली आहे. याशिवाय एप्रिल महिन्यातील ५० प्रकल्पातील विकासकांनी माहिती संकेतस्थळावर अद्ययावत केली. परंतु महारेराकडे सादर केली नाही. या विकासकांनी ही माहिती महारेराकडेही सादर केल्यास हे प्रमाण ५७ टक्के होणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : पालिकेची मदत बेस्टसाठी अपुरी…

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च २०२३ च्या तुलनेत एप्रिल महिन्यात प्रपत्रे अद्ययावत करण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. या तीन महिन्यांत किती सदनिका, गॅरेजची नोंदणी झाली, किती रक्कम यापोटी मिळाली, किती खर्च झाला, प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल झाला का, इत्यादी माहितीचा तपशील असलेले प्रपत्र एक, दोन व तीन महारेराच्या संकेतस्थळावर नोंदवणे, अद्ययावत करणे आणि महारेराकडे सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. या तरतुदींची ग्राहकहिताच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी महारेराने जानेवारीत नोंदवलेल्या प्रकल्पांच्या पहिल्या तिमाही अहवालांपासून प्रकल्पांच्या तिमाही वित्तीय प्रगती अहवालाचे संनियंत्रण सुरू केले होते. याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या विकासकांचे प्रकल्प स्थगित करण्याची कारवाई केली. त्यानंतर सकारात्मक परिणाम दिसू लागला असून आता नोटिस जारी न करता विकासक हा तपशील अद्ययावत करीत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला.

आणखी वाचा-ट्रक चालकांच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटका, डिझेलअभावी बस सेवा ठप्प होण्याची चिन्हे

यात आतापर्यंत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये त्रैमासिक अहवाल सादर न करणाऱ्या ७४१ प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली. यापैकी १९५ प्रकल्पांनी दंडात्मक रक्कम भरून प्रपत्रांची पूर्तता केली. सध्या ५४६ प्रकल्प स्थगित असून त्यांची बँक खातीही गोठविण्यात आली आहेत.

खरेदीदारांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी रेरा कायद्यातील तरतुदींची विकासकांनी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचीच काटेकोर तपासणी महारेरा करीत असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली. कारवाई होऊच नये, यासाठी विकासकांनीही तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. कारवाई शून्य व्हावी, असाच महारेराचा प्रयत्न आहे. -अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा

Story img Loader