मुंबई : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (महाज्योती) राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या (एमपीएससी) प्रशिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या निकालात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. ही परिक्षा २०० गुणांची असताना अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून लवकरच सुधारित निकाल जाहीर केला जाईल, असे ‘महाज्योती’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२५ आणि २६ ऑक्टोबर रोजी एमपीएससी प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण ८ सत्रांमध्ये चाळणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण ३९ हजार ७८६ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील १९ हजार १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल शनिवारी ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर करण्याचे काम एका संस्थेला देण्यात आले होते. मात्र निकालात गोंधळ झाल्यानंतर हा निकाल संकेतस्थळावरून  हटविण्यात आला आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध केला जाईल. त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असा खुलासा ‘महाज्योती’मार्फत काढलेल्या पत्रकात केला आहे.

हेही वाचा >>>१४९ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या अध्यक्षाला अटक; ईडीची कारवाई

विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा करून घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत प्राप्त झालेले गुण आणि गुणांचे नॉर्मलायक्षेशन केल्यानंतर येणारे प्राप्त गुण याची माहिती निकालद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर  संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल लावण्यात येईल, असे स्षष्टीकरण ‘महाज्योती’कडून देण्यात आले आहे.

नेमका दोष कुणाचा?

निकाल हटविल्यानंतर ‘महाज्योति’ने पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार संबंधित संस्थेने गुणांची मोजणी करताना (नॉर्मलायझेशन) रेल्वे भरती बोर्डाद्वारे वापरण्यात येणाऱ्या सूत्राचा वापर केला आहे. मात्र नॉर्मलायझेशन योग्य रीतीने केल्याचे या संस्थेने कळविले आहे. आता ‘महाज्योती’मधील तज्ज्ञांकरवी सूत्र बरोबर आहे का याची खात्री केली जात आहे.  याबाबत  अधिक भाष्य करण्यास महाज्योतीच्या अधिकाऱ्ऱ्यांनी नकार दिला.