पुरातन वास्तूला साजेशी वातानुकूलित मंडई उभी राहणार; मध्यभागी मनोरंजन मैदान, खुल्या थिएटरची उभारणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फळ-भाजीवाल्यांचा कलकलाट, ठिकठिकाणी पडलेला गवत, भाजीपाल्याचा कचरा, मांसाचा कुबट वास, ग्राहकांचा गजबजाट, बाहेर बेशिस्तपणे उभी असलेली वाहने असे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रिटिशकालीन ‘महात्मा फुले मंडई’चे चित्र. मात्र हे चित्र लवकरच बदलणार आहे. पुरातन वारसा लाभलेली ही मंडई वातानुकूलित होणार आहे. तसेच इमारतीला साजेशी नवी तीनमजली इमारत मंडई परिसरातच उभी राहणार आहे. सध्याच्या भाजी-फळविक्रेत्यांची व्यवस्था करतानाच मंडईच्या मध्यभागी मनोरंजन मैदान, छोटेखानी उद्यान आणि खुले थिएटरही उभारण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा फुले मंडईमध्ये पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. अखेर पालिकेने या मंडईच्या पुनर्विकासासाठी आभा नारायण लांभा असोसिएट या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आणि त्यानंतर मंडईच्या पुनर्विकासाला चालना मिळाली. महात्मा फुले मंडईमध्ये एकूण २५ छोटय़ा-मोठय़ा इमारती असून त्यापैकी चार इमारती पुरातन वारसा वास्तू आहेत. उर्वरित २१ वास्तू जमीनदोस्त करून त्या जागेवर पुरातन वारसा वास्तू दिसावी अशी तीनमजली इमारत बांधण्याचा पालिकेचा मानस आहे. या नव्या इमारतीच्या तळघरामध्ये वाहनतळ उभारण्यात येणार असून १६४ मोटरगाडय़ा आणि आठ ट्रक उभे करता येतील इतकी या वाहनतळाची क्षमता असणार आहे. जवळच असलेल्या शिवाजी मंडईमधील मासळी बाजार महात्मा फुले मंडईतील नव्या इमारतीमधील तळमजल्यावर हलविण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सध्याच्या फळ-भाजीविक्रेत्यांना गाळे उपलब्ध करण्यात येणार आहेत, तर तिसऱ्या मजल्यावर कार्यालयांसाठी जागा राखून ठेवण्यात येणार आहे.

महात्मा फुले मंडई तब्बल २२,३९४.६२ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभी आहे. त्यापैकी ६,६८७ चौरस मीटर क्षेत्रफळावर इंग्रजी भाषेतील ‘एल’ आद्याक्षराच्या आकारात मंडईतील पुरातन वारसा वास्तू उभी आहे. या वास्तूला कोठेही धक्का न लावता ७,६००.१७ चौरस मीटर क्षेत्रफळाचा पुनर्विकास करण्यात येणार असून पुनर्विकासात तब्बल १९,७३७.७० बांधकाम प्रस्तावित आहे.

सुविधा काय?

  • मंडईच्या मध्यभागी ६,७४६.७७ चौरस मीटर क्षेत्रफळावर मनोरंजन मैदानाची उभारणी करण्यात येणार आहे.
  • त्यामध्ये खुले थिएटर, छोटेखानी बगिचाचा समावेश करण्यात येणार आहे.
  • उद्यानामध्ये हिरवळीसोबतच काही निवडक झाडांची लागवडही करण्यात येणार आहे.
  • नव्या इमारतीत सौरऊर्जा प्रकल्पही बसवण्यात येणार आहे. परिणामी, विजेपोटी येणाऱ्या खर्चाची बचत होऊ शकेल.
  • इमारतीचा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
  • या मंडईमध्ये निरनिराळ्या दिशेला असलेल्या चार प्रवेशद्वारांमधून प्रवेश करता येणार आहे.
  • पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी सात उद्वाहने (लिफ्ट) बसवण्यात येणार आहेत.

महात्मा फुले मंडईमधील पुरातन वारसा वास्तूशी सुसंगत अशी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. मंडईच्या आसपासचा परिसर कायम गजबजलेला असतो. तेथे वाहनकोंडीचाही प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे अनेक जण या मंडईत येण्याचे टाळतात. आता नव्या इमारतीच्या तळघरात वाहनतळ उपलब्ध करण्यात येणार असून त्यामुळे ग्राहकांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा मिळू शकेल.

चंद्रशेखर मराठे, नगर अभियंता, मुंबई महापालिका