मुंबई : मराठा आरक्षणासह, दुष्काळ, अमली पदार्थाचे सापडणारे साठे, कायदा व सुव्यवस्था इत्यादी ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी राज्यपाल रमैश बैस यांच्याकडे केली. राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. कमी पावसामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची स्थिती असून, शेतकरी संकटात आहेत. अमली पदार्थाचे मोठे साठे सापडले असून राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हे सर्व प्रश्न राज्यातील जनतेच्या हिताचे असून या विषयांवर विधिमंडळात चर्चा होऊन राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे, हे जनतेला समजणे गरजेचे आहे, म्हणून राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी शिष्टमंडळाने राज्यपालांडे केली.राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोले म्हणाले की, मराठा समाजात असंतोषाची भावना असून उद्रेक होईल अशी परिस्थिती आहे.याखेरीज राज्यात मोठय़ा प्रामणात अमली पदार्थाचे साठे सापडले असून तरुण पिढीमध्ये हे विष पसरवून त्यांना बरबाद करण्याचे काम करणाऱ्यांवर जरब बसली पाहिजे.