राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करण्यात आला. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात आज ( १७ डिसेंबर ) महाविकास आघाडीच्या वतीने ‘हल्ला बोल’ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, भाजपाच्या वतीने ‘माफी मांगो’ आंदोलन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल’ या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. यामोर्चात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीचा हा मोर्चा सकाळी ११ वाजता भायखळा येथून सुरु होईल. त्यानंतर जिजामाता उद्याने मोहम्मद अली रोड ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीपर्यंत ( सीएसएमटी रेल्वे स्टेशन समोर ) हा मोर्चा असेल. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीसमोर सभेच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात किमान एका लाख कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : “महामोर्चा निघणारच, आडवे येऊ नका!”, शिवसेनेचा शिंदे सरकारला इशारा; म्हणाले, “महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे…”

मोर्चात कोण कोण नेते सहभागी होण्याची शक्यता?

शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर, राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील सहभागी होणार आहे. डावे पक्ष सुद्धा मोर्चात सहभागी होतील. मात्र, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण काही कारणास्तव मोर्चात सहभागी होणार नाही आहेत.

हेही वाचा : “काम करणाऱ्यांची चर्चा होते, अन् बिनकामाचे मोर्चा काढतात”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला; म्हणाले, “५० नाहीतर ७५० खोके…”

भाजपाचे ‘माफी मांगो’ आंदोलन

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देवदेवत, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. याच्या निषेधार्थ मुंबईसह राज्याच्या विविध भागांत भाजपाकडून ‘माफी मांगो’ आंदोलन केली जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi mahamorcha protest in mumbai maharashtra ssa