शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. राज्यात २०२४ पर्यंत महाविवकास आघाडीच सरकार येईल आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा त्यांना दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “लढाई संपलेली नाही, माझ्यासारख्या माणसाविरुद्ध सतत अशा खोट्या कारवाया होत राहणार हे मला माहीत आहे. त्यामुळे ही न संपणारी लढाई आहे २०२४ पर्यंत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. हे मी आजच्या दिवशी सांगतो आहे आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे.”
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे असताना संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी नमूद केलं आहे.