सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आठ जणांनी संतोषी माता रोडवरील महावितरणच्या तेजश्री कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्यास बेदम मारहाण करून कार्यालयाची तोडफोड केली. सुनील कलणकर, असे मारहाण झालेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव असून ते सोमवारी दुपारी कार्यालयातून खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बाहेर पडत होते. त्याचवेळी सतत वीज पुरवठा खंडीत असल्याचा जाब विचारण्यासाठी सात ते आठ जण कार्यालयामध्ये शिरले आणि त्यांनी कलणकर यांना मारहाण केली. यावेळी कार्यालयातील दूरध्वनी, डीएसएस मॉनीटर, नियंत्रण कक्ष, प्रवेशद्वारावरील काचा, सुरक्षा केबीनची या टोळक्याने तोडफोड केली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री डोंबिवलीतील राजाजी रोड, मोठा ठाकुर्ली परिसरात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले होते.
महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करून तोडफोड
सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आठ जणांनी संतोषी माता रोडवरील महावितरणच्या तेजश्री कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्यास बेदम मारहाण करून कार्यालयाची तोडफोड केली. सुनील कलणकर, असे मारहाण झालेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव असून ते सोमवारी दुपारी कार्यालयातून खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बाहेर पडत होते
First published on: 30-05-2013 at 03:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran engineer assault and break his office