मुंबई : महावितरण कंपनीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी २८ हजार ४३० नादुरुस्त रोहित्रे गेल्या सव्वादोन महिन्यात बदलले आहेत. रब्बीच्या हंगामात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र ताबडतोब बदलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नादुरुस्त झालेले रोहीत्र बदलण्यासाठी नवीन रोहित्राची वाहतूक व बदलण्याची कार्यवाही याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरणची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही अधिक खर्च करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाले असेल, त्याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.