‘महावितरण’ने सात हजार विद्युत सहायकांच्या महाभरतीसाठी सुरू केलली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून शुक्रवार, १० मे रोजी उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे.‘महावितरण’ने सात हजार विद्युत सहायक पदासाठी दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण अशी पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. विशेष म्हणजे उमेदवारांची निवड केवळ दहावीतील गुणांच्या आधारावर करण्यात आली आहे. कुठलीही लेखी वा तोंडी परीक्षा घेण्यात आलेली नाही. या महाभरतीमधील यशस्वी उमेदवारांची निवड यादी शुक्रवारी सायंकाळी ‘महावितरण’च्या http://www.mahadiscom.in  या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची छाननी संबंधित परिमंडळ पातळीवर होईल. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील. २० आणि २१ मे २०१३ – खुला प्रवर्ग, २२ मे – अनुसूचित जाती व जमाती, २३ मे – विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग. कागदपत्रांच्या छाननीनंतर उमेदवारास विद्युत सहायक पदाच्या नेमणुकीचे पत्र दिले जाईल. उमेदवाराने ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीत तफावत किंवा चुकीची माहिती दिल्याचे पडताळणीत आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा