काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या सायन-धारावी-माहीम पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या पुलाचा काही भाग पडल्यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे धारावी, वांद्रे जंक्शन परिसरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. दुरुस्तीसाठी सुमारे ६.६ कोटी रुपये अपेक्षित खर्चाच्या दुरुस्तीसाठी पालिकेने ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
सायन-धारावी-माहीम पुलाचे काम लवकरच सुरू
काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या सायन-धारावी-माहीम पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या पुलाचा काही भाग पडल्यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
First published on: 27-02-2013 at 02:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahim dharavi bridge work will start soon