लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या इफेड्रिनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपींपैकी एकाला अटक केली. आरोपीविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट सर्कुलर (एलओसी) जारी केले होते. या माहितीच्या आधारे त्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली.
अली असगर शिराझी असे अटक आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा पोलीस शोध घेत होते. तो श्रीनगरला पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथक श्रीनगरला रवाना झाले होते. त्याचा माग काढत पोलीस पथक दिल्लीलाही गेले होते. पण तो सापडला नाही. अखेर त्याच्याविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. तो दुबईला जाण्याचा प्रयत्न होता. मात्र मुंबई विमानतळ प्राधिकरणाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
आणखी वाचा-UPSC Result : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून पहिली, यशाचं रहस्य सांगत कश्मिरा संखे म्हणाली…
याप्रकरणातील ही महत्त्वाची अटक आहे. या टोळीचा म्होरक्या कैलाश राजपूत असून त्याच्यानंतर टोळीत शिराझी दुसऱ्या क्रमांकावर होता. या प्रकरणात १५ मार्च रोजी झालेल्या अटकेपूर्वी सहा महिन्याच्या कालावधीत या टोळीने ७२ वेळा अंमलीपदार्थ परदेशात पाठवल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे.
याप्रकरणी अली असगरव्यतिरक्त सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तस्कर कैलाश राजपूतसह तीन एलओसी जारी केले आहेत. संपूर्ण तस्करी राजपूतच्या इशाऱ्यावर करण्यात आली आहे. राजपूतविरोधात देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मुंबर्ई पोलीस याप्रकरणी इतर पोलीस व यंत्रणांकडून मदत घेत आहेत. तसेच देशभरात या टोळीसाठी कोण काम करीत आहे याची माहितीही मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा-खोकल्याच्या औषधांच्या निर्यातीसाठी आता विश्लेषण प्रमाणपत्र बंधनकारक
गुन्हे शाखेने १५ मार्च रोजी अंधेरी परिसरात छापा टाकून १५ किलो ७४० ग्रॅम केटामाईन व २३ हजारांहून अधिक वायग्राची पाकिटे जप्त केली होती. केटामाईनची किंमत सात कोटी ८७ लाख रुपये, तर वायग्राची किंमत ५८ लाख रुपये होती. याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी युरोपीयन देशासह ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, अमेरिका व दुबईमध्येही अंमलीपदार्थ व प्रतिबंधक गोळ्यांची तस्करी करीत होती. या टोळीचे हस्तक विविध देशांमध्ये सक्रिय आहेत. अंमलीपदार्थांची निर्मिती करून ते मुंबईत एकत्र आणण्यात येत होते. त्यानंतर त्याचे वितरण करण्यात येत होते. कैलास राजपूत या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.