मुंबई: मोबाईल…सोशल मिडिया व गुगलबाबामुळे हव्या असलेल्या तसेच नको असलेल्या किंवा पाहू नयेत अशा शेकडो गोष्टी सहजी दिसतात. अगदी गावखेड्यातील लहामुलांच्या हातातही आता मोबाईल असतो. यातूनच तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊ पाहाणारे तरुण तरुणींना किशोरवयीन अवस्थेत भेडसवणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आरोग्य विभागाने नेमकी हिच गोष्ट लक्षात घेऊन राज्यात मोठ्या प्रमाणात ‘मैत्री क्लिनिक’ सुरु केली असून गेल्या वर्षभरात जवळपास साडेसोळा लाख किशोरवयीन मुलामुलींना योग्य समुपदेशन केले आहे.

मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या किशोरवयीन अवस्थेत भेडसावणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक समस्यांवर समुपदेशनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेले मैत्री क्लिनिक राज्यातील किशोरवयीन मुला-मुलींसाठी आधार ठरतेय.
किशोरवयीन आरोग्यासाठी राज्यात ९५८ ‘मैत्री क्लिनिक्स’ची स्थापना करण्यात आली आहे. हे ‘मैत्री क्लिनिक’ राज्यातील निवडक जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये स्त्री रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, शहरी भागात व काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्थापन करण्यात आलेली आहेत.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Three and a half thousand seats reserved in 153 schools for RTE admission in Vasai news
वसईत आरटीई  प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
hirakani rooms , medical colleges,
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष बांधणार, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ७० कक्ष साकारणार
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल

हेही वाचा – मुंबईत गृहनिर्मिती क्षेत्रात यंदा साडेतीन हजार कोटींची खासगी गुंतवणूक, ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती

मावळणारे बालपण व खुणावणारे तारुण्य यांचा उंबरठा असलेल्या किशोरवयीन टप्प्यावर जीवनाला वेगळे वळण मिळते. शारीरिक, मानसिक, भावनिक, प्रजनन, लैंगिक, वैचारिक तसेच वर्तणुकीतील बदलाची १० ते १९ वर्षे वयोगटातील अवस्था मुला-मुलींच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची असते. या वयात पडणारे प्रश्न, भेडसावणाऱ्या समस्या यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून मिळणारी उत्तरे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवू शकतात. याच उद्देशाने केंद्र सरकारच्या प्रजनन व बाल आरोग्य भाग – दोन अंतर्गत ‘मैत्री क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत.

किशोरवयीन मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक, तसेच भावनिक बदल घडतात. या बदलांना सामोरे जाताना ते काहीसे बावरून जातात. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यात असते. ही उत्सुकता चांगल्या मार्गाने व शास्त्रीय पद्धतीने शमवण्याचा प्रयत्न ‘मैत्री क्लिनिक’मध्ये केला जातो. या क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. किशोरवयीन वयातील शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक आरोग्य, आहार, विवाहपूर्व मार्गदर्शन, कुटुंब नियोजन साधने याबाबत माहिती व समुपदेशन करण्यात येते. तसेच वैद्यकीय तपासणी व उपचाराची सुविधाही पुरवण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्लिनिकमध्ये येणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येते.

राज्यातील एकूण ९५८ किशोरवयीन ‘मैत्री क्लिनिक’मध्ये प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी व दोन स्टाफ नर्स प्रशिक्षित असून, किशोरवयीन आरोग्य ‘मैत्री क्लिनिक’मध्ये येणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांवर मार्गदर्शन केले जाते. राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये किशोरवयीन आरोग्य समुपदेशकाची नेमणूक केलेली आहे. औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, गडचिरोली, पालघर, ठाणे, यवतमाळ, नाशिक व अहमदनगर या राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या १४ जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांतील ‘मैत्री क्लिनिक’मध्ये समुपदेशक हे पद नियुक्ती करण्यात आलेले आहे. सेवा घेण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी समुपदेशन व मार्गदर्शनाचे मुख्य काम अर्श समुपदेशक करतात.

हेही वाचा – कोल्हापूर विभागाची ‘व्हाय नॉट?’ महाराष्ट्राची लोकांकिका; रत्नागिरी विभागाच्या ‘मशाल’ला द्वितीय तर पुण्याच्या ‘सखा’ला तृतीय पारितोषिक

‘मैत्री क्लिनिक’मध्ये या कार्यक्रमा अंतर्गत किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी तपासणी, समुपदेशन व मार्गदर्शन केले जोते. या क्लिनिक्समार्फत मासिक पाळीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या (आहार, एनसीडी, मानसिक आरोग्य, आर.टी.आय. एस.टी.आय., त्वचेच्या समस्या, प्रतिबंधक उपायांबाबत (ओ.सी. पिल्स., ई.सी. पील्स., आय.यु.डी) बाबत समुपदेशन व तपासणी केली जाते. समुपदेशक किशोरवयीन मुला-मुलींचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने बाह्यसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन करतात. या योजने अंतर्गत शाळेमध्ये निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, परिसंवाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे मेळावे घेण्यात येतात. ग्रामीण स्तरावर किशोरवयीन आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी ३७,३३८ पीअर एज्युकेटर निवडण्यात आलेले आहेत. ते गावपातळीवर किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा करणे, वर्तणूक बदल संवाद व माहिती शिक्षण संवाद बाबत याविषयी कार्य करतात.

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान, १० ते १९ वर्षे वयोगटातील एकूण ११,७०,०२० किशोरवयीन मुला-मुलींची नोंदणी करण्यात आली. यापैकी ११,३०,४६८ मुला-मुलींना आरोग्य सेवा देण्यात आली. तर १२,६२,९०५ मुला-मुलींना समुपदेशन सेवा देण्यात आली. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान, १० ते १९ वर्षे वयोगटातील एकूण १४,३१,५८४ किशोरवयीन मुला-मुलींची नोंदणी करण्यात आली. १३,३६,३७५ मुला-मुलींना आरोग्य सेवा देण्यात आली. तर १६,४६,१६९ मुला-मुलींना समुपदेशन सेवा देण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader