tanker-fireमुंबई-गोवा महामार्गावर रसायनाने भरलेला टँकर झाडावर आदळून टँकरने पेट घेतला. महामार्गावर माणगाव शहराच्‍या जुने माणगाव भागात ही घटना मंगळवारी चार वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
महाडकडून रसायन घेऊन येणारा टँकर माणगाव शहराच्‍या जुने माणगाव येथे आला असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि तो रस्‍त्‍यालगत असलेल्‍या झाडावर जावून आदळला. त्‍यामुळे टँकरने पेट घेतला. आग लागल्‍यानंतर टँकरमधून स्‍फोटाचे मोठमोठे आवाज यायला लागले. त्‍यामुळे परिसरात घबराट पसरली होती. महामार्गावर दोन्‍ही बाजूला अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलीस घटनास्‍थळी पोहोचले. स्‍थानिक नागरिकांनी पाण्‍याचे टँकर आणून आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागलेला टँकर बाजूला करण्‍यात आला. त्‍यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
Story img Loader