मुंबई-गोवा महामार्गावर रसायनाने भरलेला टँकर झाडावर आदळून टँकरने पेट घेतला. महामार्गावर माणगाव शहराच्‍या जुने माणगाव भागात ही घटना मंगळवारी चार वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
महाडकडून रसायन घेऊन येणारा टँकर माणगाव शहराच्‍या जुने माणगाव येथे आला असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि तो रस्‍त्‍यालगत असलेल्‍या झाडावर जावून आदळला. त्‍यामुळे टँकरने पेट घेतला. आग लागल्‍यानंतर टँकरमधून स्‍फोटाचे मोठमोठे आवाज यायला लागले. त्‍यामुळे परिसरात घबराट पसरली होती. महामार्गावर दोन्‍ही बाजूला अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलीस घटनास्‍थळी पोहोचले. स्‍थानिक नागरिकांनी पाण्‍याचे टँकर आणून आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागलेला टँकर बाजूला करण्‍यात आला. त्‍यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा