मुंबईच्या फोर्ट परिसरातील हरिश चेंबर्स या इमारतीला गुरूवारी सकाळी लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या घटनेमुळे सध्या या परिसरात वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

Story img Loader