तब्बल नऊ वर्षांनी मरीन ड्राइव्हचे आता सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ही योजना किनारपट्टी नियमन क्षेत्र व पुरातन वास्तु समितीअंतर्गत राबविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) निविदा देण्यात आली आहे. ही निविदा मान्य करण्यात आल्यास यावर्षी ऑगस्टपर्यंत सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.
जर ठरल्याप्रमाणे सगळे झाले, तर मरीन ड्राइव्हच्या सुशोभिकरणासोबतच मुंबईकरांना प्रथमच अरबी समुद्राचा आनंद लुटण्यासाठी एक बाल्कनी उभारण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीए एक कंसाकृती संरचना करणार असून, संपूर्ण भार यावरच असणार आहे. पुरातन वास्तू पारसी गेट ही पुनर्संचयित केली जाईल़, राज कुमार मार्गावरील रस्ता दुचाकी चालकांसाठी रुंद करण्यात येईल. जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत अधिकार प्रदान समितीअंतर्गत 2004साली हा ठराव करण्यात आला होता. मात्र, या वर्षातील फेब्रुवारीपर्यंत कोणतीही हालचाल यात दिसली नव्हती. एमएमआरडीए पुढील एक वर्षात या प्रकल्पातील मुख्य वैशिष्ट्यपूर्ण बाबी पूर्ण करणार आहे. तसेच आर्किटेक्टनी सुचविलेल्या घटकांवर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी येणारा खर्च हा 2 ते 3 कोटींपेक्षा अधिक असणार नाही, असे एमएमआरडीएचे मुख्य आयुक्त यु पी एस मदान यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा