नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील अडचणी सर्व संबंधितांशी चर्चा करून दूर केल्या जातील आणि त्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक बोलाविण्यात येईल असे स्पष्ट करीत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कृती आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले.
प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के योजनेनुसार भूखंडाचे वाटप जलदगतीेने होण्यासाठी प्रक्रियेत बदल करण्यात येत आहे. गावनिहाय एकाच वेळी भूखंड वाटप करण्याची पारदर्शक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी ग्राहक सुविधा केंद्रही सुरू केले जाणार आहे. तक्रार निवारणासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Story img Loader