‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम मुंबईत होत असताना महाराष्ट्र राज्याच्या दालनात मात्र साराच आनंदी आनंद आहे. राज्य शासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसतो वा साधे माहितीपत्रक मिळण्याचीही सोय नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्राच्या दालनात राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन होईल, असे काहीच दिसत नाही. राज्यात नेमके काय चालले आहे, गुंतवणुकीला कोठे संधी आहे याची माहितीपुस्तिकाही उपलब्ध होत नाही. दालनाची जबाबदारी एका संस्थेवर सोपविण्यात आली असून त्यांचेच कर्मचारी सारा कारभार बघत आहेत. आंध्र प्रदेश सरकारने मंगळवारी सादर केलेल्या गुंतवणूक परिषदेची मात्र उलट स्थिती दिसून आली. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू येणार म्हणून सकाळपासूनच आंध्र प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. परिषदेच्या ठिकाणी प्रत्येकाला किंवा प्रत्येक खुर्चीवर आंध्र प्रदेश सरकारची पुस्तिका किंवा सीडी उपलब्ध करून देण्यात आली होती. आंध्र प्रदेश सरकारचे अधिकारी जातीने लक्ष घालीत होते. परिषदेत एका गुंतवणूकदाराने आंध्रमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविताच चंद्राबाबूंनी संबंधित अधिकाऱ्याला त्याची नोंद घेण्याची सूचना केली. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या गुजरात गुंतवणूक परिषदेत सारे गुजरातमय वातावरण होते.

महाराष्ट्राच्या दालनात चित्रपटपर्वाचा आढावा घेताना दर्शनी भागात ‘लगान’ चित्रपटाचे पोस्टर झळकत आहे. आता लगान चित्रपट ही राज्याची संस्कृती आहे का, असा प्रश्न या दालनाला भेट देणाऱ्यांना पडतो.

सोमवारी ‘मेक इन मुंबई’वर चर्चासत्र झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मराठीचा गंध नसणाऱ्या एका मुलीकडे सोपविण्यात आली होती. तिला मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उच्चार करता येत नव्हता. मुख्यमंत्र्यांनंतर या मुलीने थेट महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांचा उल्लेख केला. या मुलीचेअज्ञान लक्षात घेता आयुक्त मेहता यांनी  मुलीकडून माईक काढून घेण्याची सूचना श्रीनिवासन यांना केली.

मंत्री, आमदार, खासदार तुरळकच

वांद्रे-कुर्ला संकुलात होत असलेल्या या सप्ताहाकडे सत्ताधारी भाजपमधील मंत्री, आमदार, खासदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई वगळता  परिसंवाद, चर्चासत्रे व अन्य कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रातील मंत्री, आमदार-खासदार यांची उपस्थिती जाणवत नाही.

या सप्ताहात महाराष्ट्रात गुंतवणुकीविषयी चर्चासत्र, मेक इन मुंबई यासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रे होत आहेत. परिसंवाद व अन्य कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, मनोहर पर्रिकर, हंसराज अहीर हे गेल्या तीन-चार दिवसांत आले होते. अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्राबाबू नायडू, आनंदीबेन पटेल, रमणसिंह, मनोहरलाल खट्टर आदींचा समावेश होता. या मुख्यमंत्र्यांनी देशी-विदेशी उद्योगपतींच्या शिष्टमंडळांशी भेटीगाठी घेतल्या. अन्य राज्यांच्या दालनांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना महाराष्ट्राच्या दालनात आणि कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, देसाई वगळता अन्य मंत्र्यांनी फारसा रस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे मेक इन मुंबई परिसंवादाला उपस्थित होते, पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री एकनाथ खडसे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आदींसह अनेक मंत्र्यांची फारशी उपस्थिती नाही. मेक इन इंडियाचे आयोजन होत असताना आपल्याला कोणतीच माहिती दिली जात नाही, अशी तक्रार  मंत्र्यांनी  केली होती.