मुंबई : मालाड पूर्व येथील त्रिवेणी नगर परिसरात बुधवारी रात्री एक विचित्र अपघात झाला. विजेचा धक्का लागून एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडली. या दुर्घटनेत या तरुणाचा मृत्यू झाला.

मालाड पूर्व परिसरातील त्रिवेणी नगरमधील पारेख नगर गार्डनच्या समोर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. विजेचा धक्का लागल्यामुळे एक तरुण बाजूच्याच नाल्यात पडला. २५ फूट खोल आणि १० फूट रुंद नाल्यात ही व्यक्ती पडला. परिसरातील राहिवाशांनी त्याला नाल्यातून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कमलेश चंद्रकांत शितब असे या तरुणाचे नाव आहे.

Story img Loader