Malad West Assembly constituency 2024 Congress Aslam Shaikh vs NDA : मालाड पश्चिम हा विधानभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येतात. ज्यामध्ये बोरिवली, कांदिवली, चारकोप, मालाड पश्चिम, मागाठाणे आणि दहिसर या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी मालाड पश्चिम मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत. तर मालाड पश्चिम विधानसभा मविआकडे आहे. काँग्रेसचे नेते अस्लम शेख हे येथील विद्यमान आमदार आहेत. २००९ साली हा मतदारसंघ तयार करण्यात आला होता. तेव्हापासून अस्लम शेख सलग तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसलाच सुटेल अशी शक्यता आहे. शिवसेनेचा ठाकरे गट ही जागा मागू शकतो. मात्र काँग्रेसचे अस्लम शेख यांनी त्यांची दावेदारी मजबूत केली आहे. मात्र शेख यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध होत आहे. काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते येथून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अंतर्गत वाद मिटवून शेख यांना पुन्हा उमेदवारी कशी द्यायची हा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे आहे. दुसऱ्या बाजूला भाजपा व शिंदे गट हे अस्लम शेख यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेख यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर ते महायुतीच्या मार्गावर जाऊ शकतात.

satara congress seats marathi news
साताऱ्यात वाई, कराड दक्षिण, माण मतदारसंघाची काँग्रेसकडून मागणी
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
mentality of Congress is to end reservation in country bjp mp anurang thakur attack on rahul gandhi
पुणे :आरक्षण संपवणे ही काँग्रेसची मानसिकता, भाजपच्या खासदाराचा घणाघात
Parliamentary Standing committee
Parliamentary Standing Committee : काँग्रेसला मिळाल्या संसदेच्या चार स्थायी समित्या, सत्ताधाऱ्यांबरोबरच्या वाटाघाटीत मोठं यश
Akkalkot Assembly Election 2024| MLA Sachin Kalyanshetti vs Siddharam Mhetre in Akkalkot Assembly Constituency
कारण राजकारण : लिंगायत मतांमुळे अक्कलकोटमध्ये भाजप सुरक्षित
Why AAP and Congress failed to strike Haryana poll deal
Haryana Assembly Election: हरियाणामध्ये काँग्रेस-आप आघाडीचं घोडं कुठं अडलं? इंडिया आघाडी फक्त लोकसभेपुरती?
haryana assembly election 2024
Haryana Assembly Elections 2024″ भाजपाला हरियाणात मोठा धक्का, प्रदेश उपाध्यक्षांनीच काँग्रेसची वाट धरली!
kerala bjp rss pinarayi vijayan government
RSS सरकार्यवाह होसबळेंची वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी भेट, पूरम उत्सवात गोंधळ आणि भाजपाचा विजय – काँग्रेसचा गंभीर आरोप!

हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!

काँग्रेसचे अस्लम शेख हे १५ वर्षांपासून मालाड पश्चिमचे आमदार आहेत

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शेख यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती. त्याचबरोबर ते शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे दावे देखील केले गेले. मात्र पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा विधानसभेचं तिकीट दिलं आणि शेख यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवला. शेख यांनी त्यावेळी भाजपाच्या रमेश सिंग ठाकूर यांचा १० हजार मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा विधानसभा गाठली होती.

महायुतीत उमेदवारीसाठी स्पर्धा

दुसऱ्या बाजूला मालाड पश्चिममधून उमेदवारी मिळाली यासाठी महायुतीत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचा शिंदे गट आग्रही आहे. या मतदारसंघात ३० टक्के मुस्लीम मतदार आहेत. तसेच कोळी व मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. भाजपाकडून रमेश सिंग ठाकूर हे येथून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला

हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर या जागेवर भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी सहज विजय मिळवला. मात्र त्यांना मालाड पश्चिम मतदारसंघात आघाडी मिळवता आली नव्हती. काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना या मतदारसंघात मताधिक्य मिळालं होतं. मात्र इतर पाच मतदारसंघातील आघाडीमुळे गोयल यांना सहज विजय मिळवता आला.

मढ, मार्वे, मालवणी,मनोरा ,मालाड पश्चिमचा भाग मिळून बनलेला हा मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे सर्वात जास्त म्हणजेच ३ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे ३ नगरसेवक आहेत.आमदार होण्यापूर्वी अस्लम शेख हे या मतदारसंघातून एकदा समाजवादी पार्टीच्या तिकीटावर तर एकदा काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?

या मतदारसंघात १.९० लाख मतदारांची संख्या आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

अस्लम शेख (काँगेस) : ७९,४९४
रमेश सिंग ठाकूर (भाजपा) – ६९,०९२

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

अस्लम शेख (काँगेस) : ५६,५७४
राम बारोट (भाजप) : ५४,२७१
विनय जैन (शिवसेना) : १७,८८८
दीपक पवार (मनसे) : १४,४५२