मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे न्यायालयातून गहाळ झाल्याबद्दल काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधानसभेत गुरुवारी राज्य सरकावर जोरदार टीका केली. आरोपींना सरकार मदत करीत असल्याचा आरोपही करण्यात आला.
मालेगाव स्फोटाशी संबंधित कागदपत्रे गहाळ झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी उपस्थित केला. मुलुंड स्फोटातील आरोपींनी कालच शिक्षा झाली, पण मालेगाव स्फोटातील आरोपींचा जबाब असल्याची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. ही गंभीर घटना असून, आरोपींना मदत व्हावी या उद्देशानेच हे सारे घडवून आणल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) यांनी केला. सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी आस्लम शेख, नसिम खान, अमिन पटेल (काँग्रेस) यांनी केली. न्यायालयाच्या ताब्यातील कागदपत्रे जर गहाळ झाली असतील तर सरकारचा संबंध काय, असा सवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
मालेगाव स्फोटातील कागदपत्रे गहाळ झाल्याबद्दल टीका
आरोपींना सरकार मदत करीत असल्याचा आरोपही करण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2016 at 00:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malegaon blast documents missing