मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे कुल्र्यामधील गोवाला कंपाऊंडची जागा हडप करण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम टोळीतील सदस्यांनी आखलेल्या कटात सहभागी होते. तसेच त्याबाबतच्या आर्थिक गैरव्यवहारातही त्यांचा थेट सहभाग होता हे दर्शवणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण नोंदवून मलिक यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने घेतली. तसेच मलिक यांच्यासह १९९३च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील दोषसिद्ध आरोपी सरदार शाहवली खानविरोधातील फौजदारी प्रक्रियाही सुरू केली.

मलिक यांच्याविरोधात ईडीने गेल्या महिन्यात पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. कायद्यानुसार, फौजदारी प्रक्रिया पुढे सुरू ठेवायची असल्यास न्यायालयाकडून आरोपपत्राची दखल घेणे आवश्यक आहे. त्यानुसार विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिक यांच्याविरोधातील ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली व पुढील फौजदारी प्रक्रिया सुरू केली.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”

नवाब मलिक यांनी दाऊद टोळीच्या सदस्य असलेल्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्याशी संगनमत करून मुनिरा प्लंबरच्या मालकीची गोवाला कंपाऊंडची मालमत्ता हडपण्याचा गुन्हेगारी कट रचला, असेही न्यायालयाने मलिक यांच्याविरोधातील आरोपपत्राची दखल घेताना नमूद केले. मलिक यांचे पारकर आणि इतरांच्या संगनमताने कुर्ला येथील मालमत्ता हडपण्याचे कृत्य हे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा आहे. मलिक हे आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात थेट आणि हेतुपूर्वक गुंतलेले आहे हे दर्शविणारा प्रथमदर्शनी पुरावा आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

मलिक यांच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि सादर करण्यात आलेल्या विविध कागदपत्रांचे अवलोकन केल्यास मलिक यांच्यावरील फौजदारी कारवाई पुढे सुरू करण्यास पुरेशी कारणे आहेत. त्यामुळेच या प्रकरणात प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने मलिक यांच्याविरोधातील आरोपपत्राची दखल घेताना नमूद केले.

सहआरोपी सरदार खानची मलिक यांना मदत

सरदार खान यांनी ईडीला दिलेल्या जबाबानुसार (हा जबाब आरोपपत्राचा भाग आहे), त्याचा भाऊ रेहमान हा मुनिरा प्लंबरच्या वतीने गोवाला कंपाऊंडमधील भाडेकरूंकडून भाडे वसूल करत होता. मलिक यांनी त्यांचा भाऊ अस्लम मलिक यांच्यामार्फत गोवाला कंपाऊंड येथील कुर्ला जनरल स्टोअर ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. १९९२ पुरानंतर हे स्टोअर बंद करण्यात आले होते आणि त्यानंतर हे स्टोअर अस्लम यांच्या नावे करण्यात आले.

मलिक यांच्यावरील आरोप

हसीना पारकरने फसवणूक करून मिळवलेली ही मालमत्ता मलिक यांना विकली. मलिक यांचा मुलगा फराज आणि अन्य दोघांनी हसीन पारकरच्या दक्षिण मुंबईतील साथीदाराची भेट घेऊन मालमत्ता खरेदीचे पाच लाख रुपये रोख आणि पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. सरदार शाहवली खानने मलिक यांना ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी मदत केली होती. मलिक यांनी हसीना पारकरला पैसे देणे हे दाऊदच्या टोळीला आर्थिकदृष्टय़ा मदत करण्यासारखे असल्याचा ईडीचा आरोप आहे.

हसीना पारकरच्या मुलाचा दावा

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात हसीना पारकरचा मुलगा अलिशान याच्या जबाबाचाही समावेश आहे. त्यानुसार, त्याच्या आईचे २०१४ पर्यंत म्हणजेच तिच्या मृत्यूपर्यंत दाऊदशी आर्थिक व्यवहार होते. तसेच सलीम पटेल हा तिच्या साथीदारांपैकी एक होता. पटेलसह त्याच्या आईने गोवाला कंपाऊंडचा वाद मिटवला आणि कार्यालय सुरू करून त्याचा काही भाग ताब्यात घेतला. नंतर आईने तो मलिक यांना विकला.

Story img Loader