मुंबई : मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा कांस्य पुतळा कोसळल्याचा दावा आपटे याने जामिनाची मागणी करताना केला आहे.

यापूर्वी आपण नौदलासाठी कांस्य पुतळ्यांचे काम केले आहे. परंतु, नौदलाकडून आपल्या कामाबाबत कधीच तक्रार केली गेली नाही. याउलट, धातू शास्त्रांतील तांत्रिक कौशल्याबाबत काहीच माहीत नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी दुर्घटनेच्या नऊ तासांच्या आतच या प्रकरणी तक्रार नोंदवल्याचा दावा आपटे याने याचिकेत केला आहे. शिवाय, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्ररीत नमूद नाही. त्यामुळे, हे प्रकरण निष्काळजीपणाचे असू शकते, असा दावाही आपटे याने याचिकेत केला आहे. हा पुतळा अनेक शतके टिकेल आणि सुस्थितीत राहील हे लक्षात घेऊन खबरदारीचे सर्व उपाय केल्याचा दावा देखील आपटे यांनी जामिनाची मागणी करताना केला आहे.

raj thackeray criticized sharad pawar
“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
ngo voting awareness
मुंबई: बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा,…
Aditya Thackeray vidhan sabha
वरळीतील ठाकरे गटाच्या प्रचाराची भिस्त तीन आमदार, दोन माजी महापौर, माजी उपमहापौरांवर
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता

हेही वाचा – पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण

हेही वाचा – Devendra Fadnavis : “इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं”, फडणवीसांकडून हैदरबादी भाषेत ओवैसींना चिमटा; औरंगजेबाचा उल्लेख करत म्हणाले…

सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर जामिनाच्या मागणीसाठी आपटे याने वकील गणेश सोवनी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठासमोर आपटे याच्या याचिकेची सुनावणी होणार आहे. दरम्यान, गेल्यावर्षी ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फुटांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. दोन कोटी ४४ लाख रुपये खर्चून हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, २६ ऑगस्ट रोजी हा पुतळा अचानक कोसळला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे या प्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर आपटे याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर, सुरुवातीला आपटे फरारी होता. नंतर तो पोलिसांना शरण आला.