मुंबई : विदेशी महिला व तिच्या मैत्रीणीचा विनयभंग करणाऱ्या लक्ष्मण संतराम कुमार (३७) याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. आयुर्वेदिक मसाज करताना आरोपीने दोघींचे मोबाइलवर चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. ३३ वर्षांची पिडीत महिला स्पॅनिश नागरिक असून ती नोव्हेंबर २०२४ पर्यटन व्हिसावर भारतात आली होती.

सोमवारी तिने समाज माध्यमावरून आयुर्वेदिक मसाज करणाऱ्या लक्ष्मणशी संपर्क साधला होता. त्यानंतर विदेशी महिला व तिची मैत्रीण दोघे मढ येथील त्याच्या बंगल्यावर गेले होते. त्यावेळी मसाज करताना आरोपीने त्यांना अश्लीलरित्या स्पर्श केला. यावेळी त्याच्या बाजूलाच टेबलावर त्याचा मोबाईल होता. त्याने मसाज करताना तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा तिला संशय आला होता. त्यानंतर महिलेने याप्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला व तक्रार केली.

हेही वाचा…नीलकमल बोट अपघात : बोटीच्या सांगाड्यात मृतदेह सापडला मृतांचा आकडा १४ वर

या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विदेशी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी लक्ष्मण कुमारविरुद्ध ६४, ७५ (१) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल जप्त केला असून तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

Story img Loader