बोरिवली पश्चिम येथे राहत्या घरात शिरून १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला एमएचबी. मार्ग पोलिसांनी सोमवारी अटक केली. जयहिंद निषाद (४२) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपहारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी साडी विक्रेता असून रविवारी पीडित महिलेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तो घरात शिरला. त्यानंतर पीडित मुलीवर त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणानंतर पीडित मुलीने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानुसार आरोपी विरोधात घरात जबरदस्तीने घुसणे, धमकावणे, बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी पहाटे राहत्या परिसरातून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-07-2024 at 22:00 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for minor girl rape in borivali mumbai print news zws