इमारतीच्या सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना कुंभारवाडा येथे घडली आहे. व्ही.पी. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद काझी (४५) या इसमाला अटक केली आहे. मंगळवारी पहाटे ही ८ वर्षांची मुलगी शौचालयात गेली होती. तिच्यापाठोपाठ काझी तिथे गेला आणि त्याने तिचा विनयभंग केला. त्या मुलीने घाबरून आरडाओरड केल्याने इमारतीचे रहिवासी जागे झाले. त्यांनी काझीला पोलिसांच्या हवाली केले.

Story img Loader