पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला समता नगर पोलिसांनी अटक केली असून अज्ञात व्यक्तींपासून शाळकरी विद्यार्थिनींनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी निशांत अग्रवाल (३६) याला अटक केली आहे. समता नगर परिसरात सकाळी सातच्या सुमारास बरखा बहार बिल्डिंगजवळ ऐका इसमाने शाळा कोठे आहे, असे संबंधित मुलीला विचारले. तू तेथेच चालली असल्यास तुला सोडतो, असे सांगून गाडीत बसविले आणि  एका निर्जन रस्त्यावर तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला धमकावून सोडून दिले. अखेर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  शोधाअंती त्याला अटक करण्यात येवून ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.

Story img Loader