पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला समता नगर पोलिसांनी अटक केली असून अज्ञात व्यक्तींपासून शाळकरी विद्यार्थिनींनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी निशांत अग्रवाल (३६) याला अटक केली आहे. समता नगर परिसरात सकाळी सातच्या सुमारास बरखा बहार बिल्डिंगजवळ ऐका इसमाने शाळा कोठे आहे, असे संबंधित मुलीला विचारले. तू तेथेच चालली असल्यास तुला सोडतो, असे सांगून गाडीत बसविले आणि एका निर्जन रस्त्यावर तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला धमकावून सोडून दिले. अखेर समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शोधाअंती त्याला अटक करण्यात येवून ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा