मुंबई: घरात कोणीच नसल्याची संधी साधून जन्मदात्या पित्यानेच १३ वर्षीय मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
कुटुंबियासोबत राहणारी पीडित मुलगी परिसरातील शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. तिची आई घरात नसल्याची संधी साधून आरोपीने अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाकडे वाच्चता केल्यास ठार मारण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती.
दोन दिवसांपूर्वी अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.