मुंबई : विक्रोळीच्या येथे एका ४० वर्षीय आरोपीने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसह राहत असून तिच्याच परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमासह तिची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती.

हेही वाचा >>> वरळी बीडीडी प्रकल्पातील चटईक्षेत्रफळ अखेर विक्रीस!

या आरोपीने मुलीला महिन्याभरापूर्वी त्याच्या घरी बोलावले. त्यावेळी आरोपीने मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अनेकदा मुलीवर अत्याचार करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी ही बाब मुलीने कुटुंबियांना सांगितली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बुधवारीच आरोपीला अटक केली आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader