मुंबईः सहा वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३० वर्षीय तरूणाला शनिवारी रात्री अंधेरी पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात. त्या ओळखीचा फायदा उचलून आरोपीने पीडित मुलीवर शनिवारी सायंकाळी लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती तिच्या आईला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३७६(२) (जे), ३७६(२) व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपीला शनिवारी रात्री अटक केली.

Story img Loader