मुंबईः परळ येथील केईएम रुग्णालयाच्या शेजारच्या पदपथावर एक वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या २७ वर्षीय तरूणाला भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित मुलगी पदपथावर झोपली असताना आरोपी तेथे आला व तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईला मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी भोईवाडा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम ७४ व पोक्सो कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस पथकाने घटनास्थळावरून मंगळवारी आरोपीला अटक केली. आरोपीही पदपथांवर राहणारा असून संतोष विष्णु गौतम (२७) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा पुण्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.