मुंबई : हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये एका दाम्पत्याचे बॅगेसह २३ लाख ५५ हजार रुपयांचे मौल्यवान दागिने चोरणाऱ्या ६३ वर्षीय आरोपीला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. तसेच, या गुन्ह्याचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

हेही वाचा >>> मुंबई विमानतळावरून उद्यापासून दक्षिण मुंबई, नवी मुंबईसाठी प्रीमियम बस सेवा सुरू

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक
burglar in pune arrested involved in four crime cases
घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पकडले; चार गुन्हे उघड
Crimes against three persons for consuming ganja in public places in Kalyan
कल्याणमध्ये सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तीन जणांवर गुन्हे
Piles of garbage in Pimpri during Diwali average of two hundred tons of waste every day
दिवाळीत पिंपरीमध्ये कचऱ्याचे ढीग; दररोज सरासरी दोनशे टन कचऱ्याची भर

हैदराबादहून १ फेब्रुवारी रोजी तक्रारदार श्रीनामा एळूरिपाटी पत्नीसह हैदराबाद – मुंबई एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. ते २ फेब्रुवारी रोजी कल्याण रेल्वे स्थानकात उतरले. मात्र त्याची लाल रंगाची बॅग एक्स्प्रेसमध्ये राहिली. या बॅगेत एकूण २३ लाख ५५ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व कपडे होते. एक्स्प्रेसमध्ये बॅग विसरल्यामुळे त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार केली. लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी बॅगचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना केल्या. त्यानंतर गुन्हे शाखा पथकाने हैदराबाद – मुंबई एक्स्प्रेसचे कल्याण, दादर व सीएसएमटीवरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पाहिले. यावेळी दादर रेल्वे स्थानकात आलेल्या हैदराबाद – मुंबई एक्स्प्रेसमधून एक व्यक्ती लाल बॅग घेऊन जाताना दिसली.

हेही वाचा >>> मुंबई : दादरमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

तक्रारदाराने वर्णन केलेली लाल बॅग संशयित व्यक्ती घेऊन जात असल्याचे समजले. त्यानंतर या व्यक्ती सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता, ही व्यक्ती गुजरातमधील अहमदाबाद येथे राहत असल्याचे उघड झाले. विशेष कृती दलाचे (एसटीएफ) पथक अहमदाबाद येथे रवाना झाले. या व्यक्तीचा शोध लागल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. अखेर या व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, त्याच्याकडे ४४ तोळे सोन्याचे दागिने व १ किलो ४७७ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २३ लाख ५५ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली बॅग पथकातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. तसेच त्या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी ज्येष्ठ नागरिक असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.