लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कंबाला हिल येथे महिलेला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या २७ वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपी आग्रा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित महिला ३० नोव्हेंबरला टॅक्सीतून जात असताना कंबाला हिल बस थांब्याजवळ उभा असलेला एक तरूण पीडित महिलेला पाहून अश्लील चाळे करत होता. पीडित महिलेने याबाबत गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक असल्यास वाहन जप्त होणार!

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले. त्यावेळी आरोपीचा भाऊ शीव कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला विचारले असता आरोपीचे नाव दिनदयाल सिंह (२७) असल्याचे सांगितले. आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यानुसार पोलसांनी तेथे जाऊन आरोपीला अटक केली.

Story img Loader