मुंबई : नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी ३१ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. छठपूजेच्या दिवशी सायंकाळी ही घटना घडली होती. आरोपी महेश्वर मुखियाने सणासुदीच्या दिवशी सांताक्रूझ पश्चिम येथील त्याच्या राहत्या घराजवळून मुलाचे अपहरण केले आणि त्याचा गळा दाबून खून केला. नंतर त्याने मृतदेह गोणीत भरून सांताक्रूझ येथील एका कपड्याच्या कारखान्याच्या छतावर टाकला आणि तो बिहारला पळून गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> डबेवाल्यांच्या व्यवसायाला घरघर; मुंबई डबेवाला असोसिएशनची शासन दरबारी याचना

आरोपीने पीडित मुलाला आमिष दाखवून सोबत नेले होते. त्यानंतर नऊ वर्षांचा मुलगा ७ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला होता, ८ नोव्हेंबर रोजी मुलाच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सांताक्रुझ परिसरात दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर ११ नोव्हेंबर रोजी या मुलाचा कुजलेला मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेह सापडल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले.

हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठाचे पुनर्परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर

परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी करण्यात आली. त्यात आरोपी एक गोण घेऊन संशयास्पदरित्या परिसर सोडून जाताना दिसला. घटनेबाबत अधिक चौकशी केली असता आरोपी त्याच रात्री बिहारमधील मधुबनी या मूळ गावी पळून गेल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना झाले. अनेक तास पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी शनिवारी मधुबनी येथून महेश्वरला ताब्यात घेतले आणि त्याला मुंबईत परत आणले. मुलगा ओरडू लागला, त्यामुळे त्याला मारल्याचे महेश्वरने पोलिसांना सांगितले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मुलावर अत्याचार करण्यात आल्याबाबत पोलीस तपास करीत आहेत, असे उपायुक्त दीक्षित गेदाम यांनी सांगितले.