मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी दोन लाख व हत्यार पुरवल्याचा दूरध्वनी मुंबई नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली होती. खार पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी आरोपीला पंजाबमधून ताब्यात घेतले आहे. आरोपी सुरक्षा रक्षक आहे. कामावर गैरहजर असल्यामुळे त्याचा पगार कापण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी हा प्रकार केला. आरोपीने कंपनीच्या मालकालाही अशा प्रकारे दूरध्वनी करून धमकावले होते.
म्हणून रचला कट,,,
अभिनेता टायगर श्रॉफला मारण्याचा कट रचण्यात येत असल्याचा दूरध्वनी सोमवारी मुख्य नियंत्रण कक्षाला आला होता. मनिष कुमार सुजिंदर सिंह (३५) नावाच्या व्यक्तीने हा दूरध्वनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ‘ट्रीग’ या सुरक्षा कंपनीचा एक ब्रांच हेड व एक एरिया ऑफिसर यांनी सिनेअभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी दोन लाख रुपये व हत्यार दिल्याचा दूरध्वनी सोमवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता.
आरोपीने जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर उपनिरीक्षक प्रशांत बोरसे यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी सोमवारी भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (२), २१२, २१७ अंतर्गत, सामान्य नागरिकांमध्ये द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनीष कुमार सिंह याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला पंजाबमधून ताब्यात घेण्यात आले. आरोपी सुरक्षा रक्षक असून काही दिवसांपासून कामावर गैरहजर होता. त्यामुळे त्याचा पगार कापण्यात आला होता.
पगार कापल्यामुळे संतप्त झालेल्या सिंहने ‘ट्रीग’ या सुरक्षा कंपनीचा एक ब्रांच हेड भुपेंद्र दुबे व एक एरिया ऑफिसर दिनेश सिंह यांंना कायदेशीर कारवाईत अडवण्याचा निर्णय घेतला. त्यातून आरोपीने टायगर श्रॉफला मारण्याचा कट सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रचल्याची खोटी माहिती दिली. आरोपीने कंपनीच्या मालकाचाही मोबाइल क्रमांक मिळवला होता. त्यालाही आरोपीने धमकावले.
आरोपी पूर्वी मुंबईत कार्यरत
आरोपी पूर्वी मुंबईतील खार परिसरातील एका रेस्टॉरन्टमध्ये सुरक्षा रक्षक म्हणन कार्यरत होता. त्यामुळे त्याने या रेस्टॉरन्टचा उल्लेखही दूरध्वनीमध्ये केला होता. आरोपी सिंह वारंवार कामावर गैरहजर राहात होता, त्यामुळे त्याचा पगार कापला होता. तसेच त्याला कामावरूनही कमी करण्यात आले होते. त्याच्या रागातून आरोपीने हा प्रकार केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. खार पोलिसांच्या पथकाने आरोपीला पंजाबमधून ताब्यात घेतले असून त्याला घेऊन पथक मुंबईला रवाना झाले. मुंबईत आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने दिले