परळ येथे राहणारे व्यावसायिक लखचंद राठोड (५६) यांनी आजारपणाला कंटाळून मंगळवारी सकाळी वांद्रे वरळी सागरी सेतूवरुन उडी मारून आत्महत्या केली.  
राठोड आपल्या वाहनचालकाला घेऊन मंगळवारी सकाळी वांद्रे सागरी सेतूवर गेले. तेथे त्यांनी वाहनचालकास गाडी थांबविण्यास सांगितले आणि ते खाली उतरले. काही क्षणांतच त्यांनी सेतूवरून पाण्यात उडी मारली. वाहनचालकाने त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नानंतर राठोड यांचा मृतदेह बाहेर काढला. आजारपणामुळे कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहिली होती. दीर्घकाळच्या आजारपणामुळे राठोड निराश होते असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader