सेंच्युरी मिल प्रकल्पातील म्हाडाच्या संक्रमण शिबिर परिसरातील खड्डयात पडून वरळी बीडीडीतील स्थलांतरी रहिवाशाचा रविवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर बीडीडीवासीय आक्रमक झाले असून म्हाडाकडून संक्रमण शिबिरात सोयीसुविधांची वानवा असल्याचा आरोप होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : रेल्वेच्या हद्दीतील पूलाचा भाग पाडून टाका; अंधेरी गोखले पुलाबाबत पालिकेचे पश्चिम रेल्वेला पत्र

वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडीतील पात्र रहिवाशांना टप्प्याटप्प्यात आसपासच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येत आहे. त्यानुसार वरळी बीडीडीतील इमारत क्रमांक ९ मधील रहिवासी प्रदीप आंबेरकर (५८ वर्ष) यांना सेंच्युरी मिल संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले होते. ते रविवारी दुपारी बाहेर गेले असता सेंच्युरी मिल येथील रस्त्यावरील खड्डयात पडले. त्यात त्यांच्या छातीला जबर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटने नंतर बीडीडीवासियांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सेंच्युरी मिल परिसरात सोयींची वानवा असल्याची तक्रार बीडीडीवासीयांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते सुधारण्याची मागणीही केली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा बीडीडीवासीयांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man died after falls into pit in the mhada transit camp area of century mill project mumbai print news zws