छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील आझाद मैदानाबाहेर थांब्यावरून सुटलेली बेस्ट बस पकडणाऱ्या एका तरुणाचा दुसऱ्या बसवर आदळून मृत्यू झाला. पालिका मुख्यालयासमोरील थांब्यावर मंगळवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास बस क्रमांक ६९ उभी होती. तिच्या पाठीमागे उभी असलेली बस क्रमांक १४ थांब्यावरून निघत असताना अमित सरवदे (२५) याने ती पकडली. दरवाजातून आत शिरण्यापूर्वीच तो बस क्रमांक ६९ वर आदळला आणि रस्त्यावर पडला.
या अपघातात अमित गंभीर जखमी झाला. बेस्टचे चालक आणि वाहकांनी त्याला तातडीने जी. टी रुग्णालयात नेले. परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित सरवदे हा ‘सकाळ’ वृत्तपत्रामधील जाहिरात विभागात कार्यरत होता. कामानिमित्त छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात तो आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man died in accidet for running to grab the bus