चर्चगेटहून विरारकडे निघालेल्या उपनगरी गाडीच्या ओव्हरहेड वायरचा स्पर्श होऊन गुरुवारी रात्री एका तरूणाचा मृत्यू झाला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नायगाव रेल्वे स्थानकात विरारकडे जाणारी गाडी आली असता ही दुर्घटना घडली. गाडीत गर्दी असल्याने हा तरूण गाडीच्या टपावर चढला आणि त्याचा संपर्क ओव्हरहेड वायरशी आला. या वायरमधून २५ हजार व्होल्टचा विद्युतप्रवाह वाहत होता. तरुणाचा वायरला स्पर्श होताच जोराचा आवाज आला आणि तो फलाटावर फेकला गेला. तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. पोलीस तपास सुरू होता.

Story img Loader