मालवणी पोलीस ठाण्यातील कोठडीतील आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून निष्पन्न झाले आहे. मृत आरोपीच्या गळ्यावर गळफासाच्या खुणा असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला आहे.
जावयाने केलेल्या घरफोडीच्या प्रकरणात हरी चव्हाण याला मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले होते. मालवणी पोलीस ठाण्यातील कोठडीतील खिडकीला हरी चव्हाणने शर्टाने गळफास लावून घेतल्याचे गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास आढळून आले होते. त्यानंतर त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हरी चव्हाण याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. हरी चव्हाणच्या गळ्यावर गळफासाच्या खुणा असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. तथापि, शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला आहे.
पोलीस कोठडीत कैद्याची आत्महत्या
मालवणी पोलीस ठाण्यातील कोठडीतील आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून निष्पन्न झाले आहे.
First published on: 04-04-2015 at 04:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man found hanging in police custody