टीव्ही आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका मिळवून देण्याचे आमिष देणा-या 36वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली. पुष्कर बाबरे असे आरोपीचे नाव असून, त्याला डहाणू येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल व एक लाख रुपये जप्त केले आहेत.
दिनेश जाधव, हर्षल कदम या दोन विद्यार्थ्यांनी बाबरे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या दोघांकडूनही बाबरेने खोटे आमीष दाखवून पैसे घेतले होते. आरोपीवर 406 व 420 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man held in cheating case