प्रियकराने ३२ वर्षीय महिलेची अश्लील छायाचित्रे पतीला दाखवण्याची धमकी देऊन १७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार मुंबईत घडला आहे. तक्रारदार महिलेने प्रियकराला पैसे देण्यास बंद करताच तिला मारहाण केल्याचाही उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकरासह दोन महिलांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३२ वर्षीय तक्रारदार महिलेचे अक्षय सिंह नावाच्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. सिंहने २०२१ मध्ये तक्रारदार महिलेची अश्लील छायाचित्रे काढली होती. ती छायाचित्रे व प्रेसंबंधांबद्दल पतीला सांगण्याची धमकी देऊन आरोपीने तक्रारदार महिलेकडून खंडणी मागण्यास सुरूवात केली.

हेही वाचा >>> मॉडेलची आक्षेपार्ह चित्रफित प्रसिद्ध करण्याचे प्रकरण : राखी सावंतची उच्च न्यायालयात धाव; केली ‘ही’ मागणी

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Contractor fined Rs 1.5 lakh for poor road work in Andheri
अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
pune steroid injections
पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल
cuffe parade National Company Law Tribunal Porn videos courtroom screen
न्यायदालनातील स्क्रीनवर लागली अश्लील चित्रफीत, संगणक प्रणाली हॅक केल्याचा संशय
pune dance teacher rape
पुणे : अत्याचार प्रकरणात नृत्य शिक्षकाला पोलीस कोठडी, बालकांवर अत्याचार प्रकरणात दोन गुन्हे दाखल
Fraud case filed against three brokers including Gujarati man for submitting forged visa documents
अमेरिकन वकिलातीत बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा

तक्रारदारीनुसार, महिलेने आतापर्यंत १२ लाख रुपये आरोपीला दिले होते. तसेच २० तोळे सोनेही दिले होते. ते गहाण ठेऊन आरोपी सिंहने पाच लाख रुपयेही घेतले. तक्रारदार महिनेने नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर सिंहला पैसे देणे बंद केले. त्यानंतर आरोपीने ३० नोव्हेंबर रोजी त्याच्या गोवंडी येथील राहत्या घरी बोलावले. त्यानंतर सिंह व त्याची मावशी सुनीता यांनी तक्रारदार महिलेला घरात पहाटेपर्यंत डांबून ठेवले व तसेच लाकडी दांडा व पट्ट्याने मारहाण केली. यावेळी सिंहची मावशी सुनीता हिनेही तक्रारदार महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर तक्रारदार महिलेला १ डिसेंबर रोजी पुन्हा दुपारी घरी बोलवण्यात आले. त्यावेळी सिंहची मावशी लक्ष्मी हिने ठार मारण्याची धमकी देऊन सिंह याच्याकडून १० लाख रुपये घेतल्याचे खोटे बोलण्यास सांगून त्याचे चित्रीकरण केले. घटनेनंतर महिलेने याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सिंह, त्याची मावशी सुनीता व लक्ष्मी यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी सिंहला अटक केली. १ डिसेंबर २०२१ ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान तक्रारदारांकडून आरोपीने १२ लाख रुपयांची रोकड, तसेच त्यांचे २० तोळे सोने गहाण ठेवून पाच लाख रुपये घेतले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader