मुंबई : पत्नीसोबत झालेल्या वादामुळे संतापलेल्या जावयाने सासूला टेम्पोत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी मुलुंड परिसरात घडली. या घटनेत सासूसह जावयाचाही जळून मृत्यू झाला असून याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत.   कृष्णा आष्टणकर (५६) असे जावयाचे नाव असून तो मुलुंड पूर्व येथे वास्तव्यास होता. कृष्णाची पत्नी अनेक वर्षांपासून त्याच्याजवळ राहत नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्नीसोबत झालेल्या वादाला सासू बाबी उसरे (७२) जवाबदार असल्याचा कृष्णाला संशय होता. त्यामुळे त्याचा बाबी यांच्यावर प्रचंड राग होता. सासू राहत असलेल्या परिसरात सोमवारी तो गेला. त्याने सासूला आपल्या टेम्पोत बसायला लावले. त्यानंतर त्याने सासूला जबर मारहाण केली आणि तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. गंभीररित्या होरपळलेल्या बाबीचा मृत्यू झाला. मात्र यावेळी कृष्णालाही टेंपोतून बाहेर पडता आले नाही. तोही गंभीर भाजला होता. पोलिसांनी तत्काळ त्याला पालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला. याबाबत नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.