दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका २० वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात तिचा विनयभंग झाला की बलात्कार याविषयी निरनिराळे दावे केले जात आहेत. मात्र, तरीही या विद्यार्थिनीशी असं गैरवर्तन करणारा ४० वर्षीय आरोपी नवाझू करीम शेख हा विकृत असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे. त्यानं या विद्यार्थिनीप्रमाणेच सीएसएमटी स्थानकावर आणखी पाच महिलांशी गैरवर्तन केल्याचं सीसीटीव्ही फूटेजमधून समोर आलं आहे. फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमका काय प्रकार घडला?

बुधवारी अर्थात १४ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेल्या एका लोकलच्या लेडिज डब्यात ४० वर्षीय नवाझू शेख चढला. यावेळी एक २० वर्षीय युवती त्या डब्यात एकटी बसली होती. या विकृतानं तिच्यावर अत्याचार केले. ही युवती बेलापूरच्या दिशेनं जात होती. सीएसएमटी ते मस्जिद बंदरदरम्यान हा सगळा प्रकार घडला. या युवतीने लागलीच रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
Bibvewadi school girl murder, girl murder,
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष
Crime against minor who committed obscene act with girl who came for tutoring Pune print news
शिकवणीसाठी आलेल्या मुलीशी अश्लील कृत्य; अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा
A school van driver molested a minor student for six months
नागपूर : संतापजनक! ‌अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूलव्हॅन चालकाचा तब्बल सहा महिने अत्याचार

“मुंबईत धावत्या लोकलमध्ये बलात्कार झालाच नाही, आरोपीनं मुलीशी…”, चित्रा वाघांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाल्या…

सीसीटीव्ही फूटेजवरून समोर आली विकृती!

दरम्यान, एकीकडे या प्रकरणाची चर्चा आणि तपास चालू असताना याच विकृताचं त्याच दिवशीचं सीएसएमटी स्थानकावरचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. यामध्ये या विकृतानं आणखीन पाच महिलांशी गैरर्तन केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, करीम हे सगळं करत असताना आसपासच्या कोणत्याही प्रवाशाने त्याला हटकलं नाही. एका घटनेत करीमनं मुद्दाम आपला कोपरा एका महिलेला लावल्याचं दिसत आहे. दुसऱ्या एका महिलेला करीम मुद्दाम जाऊन धडकल्याचंही फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटलं आहे.

“मुंबई लोकलमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना गृहखात्याच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह….” अजित पवारांची टीका

महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं आणि गर्दीचा फायदा घेऊन तिथून काढता पाय घेणं अशा पद्धतीने करीम या सगळ्या गोष्टी करताना दिसत होता. तो दारूच्या नशेत असल्याचं आधी समोर आलं होतं. मात्र, नव्याने समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो जाणून-बुजून हे सर्व करत असल्याचा प्रकारही आता उघड झाला आहे.

Story img Loader