मुंबई : प्रेमसबंध ठेवण्यास प्रेयसीने नकार दिल्याने संतापलेल्या तरूणाने त्याच्या प्रेयसीवर चालत्या रिक्षात चाकूने वार केल्याची घटना भांडुप येथे घडली. याबाबत भांडुप पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई: डोक्यात लोखंडी सळी मारून २४ वर्षीय तरूणाची हत्या; आरोपीला अटक

चेतन गायकवाड (वय २७) असे या आरोपी तरुणाचे नाव असून तो भांडुपच्या टेंभीपाडा परिसरातील राहणारा आहे. याच परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाशी त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. मात्र प्रेयसीने काही दिवसांपूर्वी अचानक त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या चेतनने तिला १२ ऑक्टोबरला एका कॅफेमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाल्याने तरुणी तिच्या घरी निघून गेली. त्यानंतर १४ ऑक्टोबरला पुन्हा त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर दोघेही अंधेरी परिसरात गेले होते.

हेही वाचा >>> ताडदेव येथे हत्येप्रकरणी २३ वर्षीय तरूणाला अटक

अंधेरी येथून परतत असताना रिक्षातच चेतनने तरुणीकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र तिने यापुढे प्रेमसंबंधच ठेवण्यास नकार दिला. यावेळी आरोपी तरुणाने त्याच्याकडे असलेल्या चाकूने तरुणीच्या मानेवर वार केले. त्यानंतर आरोपी तिला भांडुप परिसरात सोडून निघून गेला. तरुणीने तत्काळ भांडुप पोलीस ठाणे गाठले. तेथे असलेल्या पोलिसांनी तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करून गुन्हा दाखल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man stabbed girlfriend in moving rickshaw in bhandup mumbai print news zws