मुंबई : वाहन उभे करण्यावरून झालेल्या भांडणात एअर गन दाखवून एका व्यक्तीला धमकावणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला अँटॉप हिल पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. नितीन अरोरा असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडे असलेली एअर गन पोलिसांनी जप्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतो. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ५०४ आणि ५०६ (II) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची ध्वनीचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली होती. त्यात अरोराच्या हातात बंदुक असल्याचे दिसत होते. फिर्यादी दीपक यांनी दिलेल्या जबाबानुसार अरोरा आणि दीपक यांच्यात वाहन उभे कारण्यावरून भांडण झाले. अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.

हेही वाचा – Video: “मला वाटत होतं, या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे…”, संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “बाकी सगळे…!”

अरोराने आपल्यावर हल्ला केला आणि नंतर आपल्याला एअर गनने धमकावले, असा दावा दीपकने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अरोराला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अरोरा एअर गन का वापरत होता आणि तो किती दिवसांपासून ती बाळगत होता हेही पोलीस तपासत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man threatened with air gun in parking dispute mumbai print news ssb
Show comments